2 लाख रुपयांची लाच घेताना रेल्वे वेल्फेअर इंस्पेक्टरला CBI ने रंगेहात पकडले

चंद्रपूर : CBI Anti Corruption विभागाने २ लाख रुपयाची लाच घेताना Railway Welfare Inspector अनुप कुमार आवळे यांना रंगेहात पकडले.

सुशी दाबगाव येथील रेल्वे कर्मचारी चरण शेलोटे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने एप्रिल २०२१ रोजी निधन झाले होते. मृत्यूपश्चात रेल्वे विभागाच्या नियमानुसार विधवा पत्नीला मिळणारा पीएफ Provident Fund, Gratuity व Pension चा लाभ त्वरित मिळवून देण्याकरता रेल्वेचे अधिकारी अनुप कुमार आवळे यांनी दोन लाख रुपयाची लाचेची मागणी केली असता ही रक्कम कुंदाताई सेलोटे यांना देणे शक्य न झाल्याने त्यांनी याबाबतची तक्रार नागपूर येथील CBI अधिकाऱ्यांना केली.

अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेता नागपुर वरून येणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याला चंद्रपूर – मुल मार्गावरील जानाळा फाटा येथे तक्रार करती कुंदाताई यांच्याकडून २ लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडून जेरबंद केले.