
घुग्घूस : येथील रामनगर मध्ये राहणारे वेकोलि निलजई डीप कोळसा खाणी मध्ये कार्यरत कर्मचारी गजानन महाजन यांचा मुलगा ऋषीं महाजन. हा होमियोपायथिक अंतिम वर्षांचा विद्यार्थी असून. तो .डॉ. वासलवार यांचे कडे सराव करीत होता.
परीक्षा जवळ आल्यामुळे तो आता अभ्यास करीत असून त्यानी रीतसर शासकीय नियमानुसार ऑनलाईन अर्ज केला होता. 25 जानेवारीला चंद्रपूर येथून कोविड लस घेण्याकरिता ऋषी यांना बोलाविण्यात आले त्या नुसार ऋषीं महाजन यांनी आज
26 जानेवारी रोजी कोविड 19ची लस टोचून घेतली व घुग्घुस परिसरात डॉ ऋषीं हा कोविड 19 ची लस घेणारा पहिला मानकरी ठरला असून
डॉ ऋषीं यांनी कोविड लस ही एकदम व्यवस्थित असून काहीही भीती बाळगण्याची अथवा घाबरण्याचे कारण नसून कोणताही विपरीत परिणाम शरीरावर होणार नाही व लस गेतल्यानंतर एकदम तंदुरुस्त असून कोणीही कोविड 19च्या लसी बाबत अफवेवर विश्वास ठेवू नये असे सुद्धा ऋषीं यांनी आपले मनोगत वय्क्त केले.