राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाने दिला अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा

0
53

चंद्रपूर : रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी अन्नत्याग सत्याग्रहाला भेट दिली. यावेळी अध्यक्ष बंङू धोतरे यांच्याशी मागण्याच्या अनुषंगाने चर्चा केली.

आज शुक्रवारी (दि. २६) उपोषणाचा सहा दिवस होता. आजच्या साखळी उपोषणात नितीन बुरङकर, ललित मुल्लेवार, प्रमोद मलिक, धर्मेंद्र लूनावत, सुधीर देव यांनी सहभाग घेतला. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. इको प्रोने केलेल्या मागण्यांसंदर्भात पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी एक बैठक लावण्याचे आश्वासन आमदार जोरगेवार यांनी दिले आहे.

दिवसभरात शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिका-यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश तिवारी, चंद्रपूर व्यापारी मंडळाचे रामजीवन सिंग परमार, प्रभाकर मंत्री, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे रवींद्र येसेकर, नगरसेविका छबुताई वैरागडे, सचिन सारडा, प्रशांत वैद्य, आजाद गार्डन मित्र मंडळाचे पदाधिकारी, चंद्रपूर सराफा असोसिएशनचे राजेंद्र लोढा, रोटरी क्लब चंद्रपूर, नंदू नागरकर, राजेंद्र गर्गेलवार, छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंङळाचे अध्यक्ष दीपक बेले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप रामेङवार, वनवैभव ज्येष्ठ नागरिक मंडळाचे विजय चंदावार, चंद्रपुर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे गोपाल ऐकरे, विनोद बुद्धावार, राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक कर्मचारी संघटनेचे दीपक हिवरे, नरेंद्र सिडाम, प्रशांत बांबल, आर्य वैश्य स्नेह मंडळ अध्यक्ष अभय निलावार, अविनाश उत्तरवार, आर्य वैश्य युथ क्लबचे सारंग कासनगोटूवार यांनी पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here