दिल्ली किसान आंदोलन समर्थनार्थ सर्व पक्षीय धरणे व निदर्शने

0
91

शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याची मागणी

चंद्रपूर : दिल्ली येथील किसान आंदोलनाला 4 महिने झाले व जवळपास 300 शेतकरी शहीद झाले तरी मोदी सरकार किसान आंदोलनाकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे म्हणून संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंद ची घोषणा केली होती त्या अनुषंगाने ब्रम्हपुरी येथे सर्व पक्षीय व विविध संघटनांच्या वतीने शिवाजी चौकात दुपारी बारा ते तीन वाजता पर्यंत धरणे व मोदी सरकार विरोधात नारेबाजी करीत तीव्र निदर्शने केली व त्या नंतर तहसीलदार मार्फत मा.पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली.

केंद्र सरकारने दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला 110 दिवसांचा कालावधी होऊनसुद्धा याची दखल घेतली नाही.तसेच 300 च्या वर शेतकरी शहीद झाले त्यांच्या बदल संवेदना व्यक्त केली नाही .केंद्र सरकारच्या संवेदन शून्य व्यवहाराचा निषेध करण्यासाठी तसेच गेल्या वर्षी कोविड-19 साथी मधील लाकडाऊन काळाचा गैरफायदा घेत केंद्र सरकारने कामगार हिताचे अनेक कायदे रद्द करून मनमानी पद्धतीने रद्द रद्द करवून चार कामगार सहिंता तयार करून देशातील कार्पोरेट घरानाच्या बाजूने कायदे केलेले आहेत .या केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी व कामगार विरोधी धोरणा विरोधात देशातील लाखो लोक सरकारच्या विरोधात आहेत.सरकारच्या या जनविरोधी कारभाराचा निषेध करण्यासाठी व दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच इतरही मागण्यासाठी 26 मार्च 2021 रोजी देशातील शेतकरी संघर्ष समन्वय समिती व कामगार संघटनांनी भारत बंद ची घोषणा केली होती त्या अनुषंगाने ब्रम्हपुरी येथे सर्व पक्षीय व विवीध संघटनांनी मोदी सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करीत निदर्शने केली व केंद्र सरकारचा निषेध करीत दिल्ली किसान आंदोलनाला पाठिंबा दिला.

आंदोलनाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वासू सोंदर्कर, विधान सभा प्रमुख जगदीश पिल्लारे ,जीवन बागडे प्रदेश सरचिटणीस रीप.पक्ष,शिवसेना नेते केवळराम पारधी, नरु नरड,सामाजिक कार्यकर्ते प्रा.देवेश कांबळे,एकलव्य सेना जिल्हा प्रमुख मिलिंद भनारे,किसान सभा तालुका अध्यक्ष विनोद राऊत, आय टक तालुका अध्यक्ष देवेंद्र भरें,अश्विन उपासे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस,नानाजी बागडे संजय गांधी निराधार समिती सदक्ष,किशोर हजारे,सुहास हजारे,गिरिधर गुर्पुडे, दुधराम आकरे,शेखर गडे,दामोधर डांगे,शालिक ननावरे,दिनेश राखडे,भूषण रुईकर,विनायक पारधी,मनोज वजाडे,नामदेव ठाकूर,संदीप कटकुर्वार,आदेश मालोदे, विठल शिऊर्कर,राहुल भोयर यासह शेतकरी उपस्थित होते.