उद्या पासून वस्ती येथे जीप शाळेत नवीन लसीकरण केंद्राला सुरुवात
घुग्घुस : नगरपरिषद परिसरात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला असून कोरोना बाधीत रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली ही या आजारातून संरक्षणासाठी कोरोना लसीकरण हे अत्यंत आवश्यक असून सध्या 45 वर्षापेक्षा जास्तीच्या वयातील नागरिकांन करिता
येथील राजीव रतन रुग्णालयात लसीकरण केंद्र शुरू आहे.
मात्र वस्ती भागातील नागरिकांना हे लसीकरण केंद्र अत्यंत लांब असल्याने नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हाता ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासन व पालकमंत्री यांच्याशी पाठपुरावा करून घुग्घुस वस्ती भागात लसीकरण केंद्राची मागणी करण्यात आली होती.
त्याचे फलीत म्हणून उद्या दिनांक 27 एप्रिल पासून नगरपरिषद परिसरातील जिल्हा परिषद शाळेत नवीन लसीकरण केंद्राला सुरुवात करण्यात येत आहे.
व येत्या आठवड्यात अजून घुग्घुस परिसरातील दोन ते तीन ठिकाणी नवीन लसीकरण केंद्राला सुरुवात करण्यात येत आहे.
ही लस शंभर टक्के पूर्णपणे सुरक्षित असून सध्या पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांनी तातळीने लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांनी केले आहे.