गडचांदूर येथे उभारण्यात येणार ५० खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

आमदार सुभाष धोटे यांच्या आवाहनाला उद्योग समूहाचा सकारात्मक प्रतिसाद

चंद्रपूर : राजुरा विधानसभा क्षेत्रतील कोरोना विषाणूचा (Covid 19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गडचांदूर येथे (Dedicated Covid Helth Centre) डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उभारण्याबाबत आज दिनांक २६ मे २०२१ रोज बुधवारला ठीक ०१ वाजता गडचांदूर येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह महेश्वरी माणिकगड सिमेंट कंपनी गडचांदूर येथे नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली.

राजुरा विधानसभेच्या औद्योगिक क्षेत्रातील चारही कंपन्यांनी एकत्रित येऊन काळाची गरज लक्षात घेऊन (Dedicated Covid Helth Centre) डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर दोन महिन्यात उभारण्यात यावे तसेच गडचांदूर येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय कायम ठेऊन येथे स्वतंत्र ३० आॅक्सिजन बेड आणि २० सामान्य बेड अशी व्यवस्था असलेले हेल्थ सेंट्रल उभारावे अशी सूचना आमदार सुभाष धोटे यांनी या चारही उद्योग समूहांना केली. यासाठी जागेची पाहणी करण्यात आली. वरील सर्व आवश्यक सुविधा उत्तम अशा नियोजनातून करून देण्याचे उद्योग समूहाकडून आश्वासन देण्यात आले. लवकरच येथे कामाला सुरुवात होऊन क्षेत्रातील जनतेसाठी येथे आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, कविता गायकवाड, विजय एकरें आवाळपुर, कर्नल दीपक डे, देवेंद्र सिंग, उदय पावर, माणिकगढ सिमेंट कंपनी, अल्ट्रटेक सिमेंट कंपनी, दालमिया सिमेंट कंपनी नारांडा, अंबुजा सिमेंट कंपनी या चारही कंपनीचे व्यवस्थापक येथे आवर्जून उपस्थित होते.