चंद्रपूर मनपातील वादग्रस्त कचरा निविदा रद्द : नगर विकास मंत्रालयातील सूत्रांची माहिती

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : महानगर पालिकेच्या घचकचरा संकलन निविदेला नगर विकास मंत्रालयातून नकार मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या निविदा प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावरून बराच वादंग झाला होता.

महानगर पालिकेने घनकचरा संकलनासाठी निविदा मागितल्या. मे स्वयंभू ट्रान्सपोर्ट, पूणे यांच्यासह पाच कंत्राटदाराना निविदा सादर केल्या. त्यातील दोन निविदा तांत्रिक पुर्तता न केल्याने रद्द करण्यात आल्या. उर्वरित चार निविदांत मे स्वयंभूचा दर सतराशे रूपये प्रति मेट्रीक होता. स्थायी स्वयंभूला काम मंजुर केले. मात्र नंतर हे कंत्राट रद्द केले. त्यानंतर पुन्हा निविदा मागितल्या.

यावेळी हे काम सात वषई आणि वाढीव तीन असे एकूण दहा वर्षाकरीता देण्यात येत असल्याचा बदल. यावेळी सुद्धा मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पूणे या कंत्राटदारसह अन्य तीन कंत्राटदरांनी निविदा सादर केल्या. मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट, पूणे या संस्थेचा कमी दर होता. मात्र आधी मंजुर झालेल्या कंत्राटातील दरात तब्बल आठशे रूपयांनी वाढ करीत कंत्राटदाराने दोन हजार ५५२ एवढी रक्कम नमूद केली आहे.हे स्वयंभू निविदा समितीने मंजुर केली.

त्यानंतर यावर बराच वादंग झाला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गि-हे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी नगर विकास मंत्रालयाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने ही निविदा रद्द करण्याचा निर्णय नगर विकास मंत्रालयाने घेतल्याची माहीती आहे.