चंद्रपूर : राज्य शासनाने कोरोनाचे कारण देत हिंदूंच्या सण, उत्सवांवर बंदी घातली आहे. त्यामुळे राज्य शासनाने ही बंदी उठवून दहीहंडी, गणेशोत्सव या उत्सवांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
राज्यात राजकीय पक्षांचे मेळावे घेतले जात आहेत. यात्रा काढल्या जात आहेत. मात्र, हिंदूंचे सण साजरे करण्याला परवानगी नाकारली जात आले.
हा अन्याय आहे. त्यामुळे हिंदूंचे सण साजरे करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रवीश सिंग यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.