घुग्घुस येथे दुसरे कोविड लसीकरण केंद्र जिप शाळात सुरु

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : औद्योगिक शहर असल्याने लोकसंख्या 50 हजाराच्या जवळपास आहे राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात कोविड लसीकरण करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत होती ही समस्या लक्षात घेत  भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी जिल्हा प्रशासनास अधिकचे कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती.

त्या अनुषंगाने मंगळवार 27 एप्रिलला सकाळी 10:30 वाजता पासून जिप कन्या शाळा केंद्र बिट-घुग्घुस येथे दुसरे कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले.

वॉर्ड नं 2 जोगी ITI, वॉर्ड नं 6 जनता विद्यालय, अंतुरला गावं, शेंनगांव या चार ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

घुग्घुस येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता घुग्घुस शहरात अधिकचे कोविड लसीकरण केंद्र सुरू करणे अत्यावश्यक होते. त्यामुळे घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांच्या मागणीस यश आले आहे.
त्यांनी आपल्या मागण्या तात्काळ मान्य केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.