सात वर्षाच्या कबीरची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : मास्टर ऑफ मास्टर निस्किन मोंक्स कुंग – फु असोसिएशनचा खेळाडू सात वर्षाच्या कबीर हितेश सूचक याने एका मिनिटाच्या आत ५० टाइल्स एकानंतर एक ब्रेक ( फोडून ) करत आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविले.

कबीर सूचक ह्याला लहानपनापासूनच कराटे ह्या खेळाची आवड होती. यापूर्वीही त्याने कराटे च्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. पण ह्यावेळेस काही वेगळे करावे ह्या उद्देशाने त्याने हा विक्रम करायचे ठरविले.  आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त केले. सदर विक्रमाचे सादरीकरण हे ऑनलाईन पद्धतीने 4 मे रोजी समितीच्या सदस्यांना दाखविण्यात आले. त्यानंतर त्यांनी योग्य पद्धतीने त्याचे मूल्यांकन करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये याची नोंद करण्याचा निर्णय घेतला.
14 मे रोजी समितिने या विक्रमाची नोंद आपल्या
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बुक मध्ये केली व त्यांनी हा पुरस्कार काल पोस्टाने पाठविले आहे.

यात नाव नोंदविण्यासाठी त्याच्या आई – वडीलांनी मेहनत घेतली. कबीरने आपल्या यशाचे श्रेय आई वडील, आणि कराटे कोच राकेश सर, अमर सर, रमेश सर , साजन सर, मास्टर संतोष कडपेवाले यांना दिले आहे.