आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात ऐकली ‘मन की बात’

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मोदींची ‘मन की बात’ घुग्घुसतील जन-जन तक!

चंद्रपूर : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, युगपुरुष श्री. नरेंद्रजी मोदी जी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा ७८ वा भाग आज सकाळी आकाशवाणी प्रक्षेपित झाला.

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा यांचेवतीने संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाचे श्रवण करावे. तसेच जवळपास दोन कोटी पेक्षा अधिक जनतेपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा यासाठी आवाहन करण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर घुग्घुस शहरातील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राने नेहमीप्रमाणे अतिशय सुयोग्य पूर्वनियोजन करून शहरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला.

सेवा केंद्रात आज सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकविण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत स्थानिकांनी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हितसंदेश ऐकण्यासाठी गर्दी केली होती.

यासोबतचं घुग्गुस मध्ये दहा ठिकाणी नागरिकांना मन की बात ऐकविण्यात आली. यातही शेकडोंच्या संख्येत ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली.
सर्वांनी पंतप्रधान मोदी यांनी देशातील ग्रामीण भागामधिल सरपंच व नागरिकांशी केलेला कोरोना व लसीकरणासंदर्भातील संवाद ऐकत महत्वपूर्ण माहितीचे श्रवण केले.

सेवा केंद्रातील कार्यक्रमाला, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, युवामोर्चाचे अमोल थेरे, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, उत्तर भारतीय मोर्चाचे रत्नेश सिंग, भाजपा नेते बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, वढा माजी उपसरपंच बंटी भोस्कर, सुरेंद्र जोगी, सुरेंद्र भोंगळे, धनराज पारखी, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, गणेश खुटेमाटे, सुशील डांगे यांसह अनेकांनी हजेरी लावली होती.