अमरावती : नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा बसस्थानक जवळील आशीर्वाद वाईन बार समोर रात्री 10.15 वाजता शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली, या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. अमोल पाटील यांच्यावर या पूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता. तर त्याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री अमोल पाटील हा आपल्या एका मित्रासोबत बार मध्ये दारू पिण्यास आशीर्वाद बारमध्ये आला होता. दरम्यान आरोपींनी अमोल पाटील यांच्या हत्येचा आधीच कट रचला होता. सुरुवातीला आरोपींना अमोलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले. दरम्यान घटनेविषयी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रिता उईके आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी वेगाने चक्र फिरवत काही तासातच चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक केली तर एक आरोपी पसार असल्याची माहिती पोलिस निरीक्षण रिता उईके यांनी दिली,अटक केलेल्या आरोपी मध्ये संदीप रामदास ढोबाळे वय 42 वर्षे, प्रवीण रामदास ढोबाळे, प्रवीण उर्फ अविनाश एकनाथ पांडे वय 30 वर्ष, रूपेश घागरे वय 22 वर्ष राहणार सर्व तिवसा तर एक जण पसार आहेत, आरोपी विरुद्ध 302,143,147,148,149, 120 (ब),34 नुसार गुन्हे दाखल केले आहे
अमोल पाटील यांची हत्या जुन्या वादातून झाली असून या पूर्वी त्याला दोन मर्डर च्या हत्यात अटक झाली होती तर तो रेतीचा व तसेच त्याचा बियर बार होता तसेच सदर घटना प्लनींगने केली असून खून करतांना आरोपी अविनाश पांडे यांनी आशीर्वाद बार मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते,रात्रीच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी धाव घेत घटनेविषयी माहिती घेतली होती.