प्रख्यात कोळसा व्यावसायिक व माजी नगराध्यक्ष सतीशबाबू तोटावार यांचे निधन

सहा दिवसापासून सुरू मृत्यूशी झुंज संपली

वणी : कोळसा व्यावसायिक तथा माजी नगराध्यक्ष सतीश तोटावार यांचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

माजी नगराध्यक्ष सतीश तोटावार यांना दि 22 ऑगस्ट ला अस्वस्थ वाटत असल्याने ते नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र काही वेळातच त्यांना ब्रेन हॅमरेज चा झटका आल्याने त्यांना नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते.

गेल्या सहा दिवसापासून त्यांचेवर उपचार सुरू होते मात्र दि 27 ऑगस्ट ला सकाळी 8:30 वाजताचे दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वर दुपारी 4 वाजताचे सुमारास वणी येथे मोक्षधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व नातवंड असा परिवार आहे.