OBC महामोर्चा आयोजकांवर पोलीस प्रशासनाने केले गुन्हे दाखल

0
572

चंद्रपूर : 26 नोव्हेंबर संविधान दिनी ओबीसी बांधवांचा विशाल मोर्चा ने प्रशासनाचे लक्ष वेधले, जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी या मोर्चात आपलिया उपस्थिती दर्शविली.
मात्र मोर्चा संपताच पोलीस प्रशासनाने ओबीसी जनगणना समनव्य समिती म्हणजेच आयोजकांवर गुन्हे दाखल केले.
नियोजित विशाल मोर्च्यांची परवानगी नसताना सुद्धा हा मोर्चा काढण्यात आला म्हणून पोलीस प्रशासनाने आयोजकांवर गुन्हे दाखल केले.
जर मोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारली तर पोलिसांनी बंदोबस्त करायला नव्हता कारण हा मोर्चा उत्तम नियोजन करून निघाला होता, विशेष म्हणजे या मोर्च्यांतील समारोपीय कार्यक्रमात पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर, आमदार धानोरकर, किशोर जोरगेवार, सुभाष धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्ह्यात आजपर्यंत अनेक आंदोलने कोविड काळात झाली त्याची परवानगी कुणाकडे नव्हती मात्र त्यांच्यावर असे गुन्हे दाखल झाले का?
हा तर ओबीसी बांधवांच्या संवैधानिक हक्कासाठी होता व यामध्ये उपस्थित नागरिकांनी कोरोना नियम सुद्धा पाळले, आयोजकांवर गुन्हे दाखल होणे म्हणजेच हा प्रशासनाचा रडीचा डाव म्हणावा लागेल.