दारुबंदी जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात दारु वाहतूकीस परवानगी देऊ नका : आमदार किशोर जोरगेवार

0
284
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि
गृहमंत्री अनिल देशमुख यांना लिहिले पत्र

चंद्रपूर : वाहतुकीच्या परवान्याआड दारुबंदी जिल्ह्यात सुरु असलेला दारु पूरवठा रोखण्यासाठी दारुबंदी जिल्ह्यातून राज्य अंतर्गत दारु वाहतूकीस परवानगी देऊ नये अशी मागणी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या मागणीचे पत्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील व गृहमंत्री अनिल देशमूख यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या तिनही जिल्ह्यात दारूबंदी आहे. परंतु लगतच्या जिल्ह्यात दारू सुरु आहे. त्या जिल्ह्यातील दारुची मागणी पूर्ण करण्यासाठी नागपूर सह इतर ठिकाणाहून दारुची मोठी वाहतूक होत आहे. सदर दारुची वाहणे दारुबंदी असलेल्या चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातून होत संबधीत जिल्ह्यात पोहचती केली जात आहे. मात्र आता याचाच फायदा दारु तस्कारांनी घेतला असून मोठ्या मद्यविक्रेत्याना हाताशी धरुन खोटा दारु वाहतूकीचा परवाना टि.पी. बनवून पोलिसांची दिशाभूल करत दारुबंदीच्या जिल्ह्यात दारु पोहचविण्याची शक्कल लढवली आहे. दारु पकडल्या गेल्यास परवाना दाखवून रस्ता चुकल्याची बतावणी करत वाहणे सोडवून घेतली जात आहे. असे अनेक प्रकार समोर आले असून दारु वाहतूकीचा परवाना असल्याने पोलिसांनाही नाईलाजास्तव वाहणे सोडावी लागत आहे.
अनेक वर्षापासुन असाच प्रकार सुरु असल्याने दारुबंदीच्या जिल्ह्यात दारुचा महापूर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या व्यवसायात गुंड प्रवृत्ती शिरल्याने गुन्हेगारीच्या प्रमाणातही प्रचंड वाढ झाली आहे. अनेक अल्पवयीन मुले व महिला या धंद्यात गुंतल्या गेल्याने बाल गुन्हेगारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता कठोर पावले उचलण्याची गरज असून दारुच्या परवान्याआड दारुबंदीच्या जिल्ह्यात होत असलेला दारुचा पुरवठा रोखण्यासाठी दारुबंदीच्या जिल्ह्यातून दारुची वाहतूक करण्यास परवाणा देऊ नये, दारुची वाहतुक करणा-या वाहणांना दारुबंदी जिल्हात प्रवेश दिल्या जाऊ नये असे आदेश राज्य उत्पादन शुल्कास देण्यात यावे अशी मागणी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे -पाटील व गृहमंत्री यांना दिलेल्या पत्रातून आमदार किशोर जोरगवार यांनी केली आहे.