चंद्रपुरातील रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ पुणे शहरात निदर्शने

0
152
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• रामाळा तलाव अन्नत्याग सत्याग्रहाचे पडसाद पुणे शहरात

• वसुंधरा अभियान बाणेर (पुणे)च्या वतीने तलाव वाचविण्यासाठी आवाहन

• गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंची उपोषण मंडपाला भेट

चंद्रपूर : शाहरातील रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी आज (रविवारी) सातव्या दिवशी पुणे येथे निदर्शने करण्यात आली. चंद्रपुरातील रामाळाप्रमाणेच इतर शहरांतील तलाव, नद्या अखेरच्या घटका मोजत आहेत. रामाळा बचाव आंदोलनाचे उदाहरण डोळ्यासमोर आंदोलनाला पाठिंबा देतानाच आपल्या शहरातील तलाव संवर्धनासाठी नागपूर, जळगाव, अमरावती येथेही निदर्शने करण्यात येणार आहेत.
आज रविवारच्या साखळी उपोषणात नितीन रामटेके, प्रमोद मलिक, कपिल चौधरी, संजय सब्बलवार, मनीषा जयस्वाल, प्रगती मार्कंडावार, पूजा गहुकर यांनी सहभाग घेतला. गोंडवाना विद्यापीठ तथा कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांनी अन्नत्याग सत्याग्रहाला भेट दिली.

माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनीही भेट घेतली.
रामाळा तलावातील जलप्रदूषण आणि इको प्रोने केलेल्या मागण्यासंदर्भात बंङू धोतरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी पर्यावरण प्रेमी प्रा. डॉ. योगेश दूधपचारे यांची उपस्थिती होती. चंद्रपूरातील रामाळा तलाव संवर्धनासाठी मागील सात दिवसांपासून सुरु असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी वसुंधरा अभियान बाणेर (पुणे)च्या वतीने रविवारी सकाळी घोषणाबाजी करण्यात आली. रामाळासह महाराष्ट्रातील सर्व नदी आणि तलावांचे इकोसिस्टम पद्धतीने संवर्धन व्हावे, यासाठी वसुंधरा अभियान आग्रही असून, पाठपुरावा करणार असल्याचे संस्थेचे पांडुरंग भुजबळ यांनी सांगितले. दिवसभरात शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिका-यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला.

जिल्हा स्टेडियम मित्र परिवार, श्रीमंत योगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशन मित्र परिवार, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना नागपूर, शाखा चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर, महाराष्ट्र वन सेवानिवृत्त असोसिएशन नागपूर, वनवृत्त चंद्रपूर, नगर संरक्षण दल बल्लारपूर, आझाद गार्डन मैत्री गृप, लिंगायत बहू उद्देशिय समाजिक संस्था, कंत्राटी कर्मचारी सेना, वाल्मिकी मच्छूुवरी सामाजिक संस्था, शाहिद भगत सिंग चौक मित्र मंडळ आदी संघटनांनी पाठींबा दिला. याशिवाय डॉ. सुरेश कोल्हे (घुगूस), डॉ. प्रमोद बनकर (निवृत्त सनदी अधिकारी, मुंबई), अविनाश पोंईनकर, ऍड. दीपक चटप, सागर दुधानी, सुवाभी सागर चांडक, ईशा विराणी, सोनल नागवानी, सीए दामोदर सारडा, अमोल मेश्राम, नगरसेवक बंडू हजारे, खुशाल हांडे, संस्कार भारती, चंद्रपूरचे अजय धावणे, महेश काहिलकर (विठाई बहूउद्देशीय संस्था), रफिक कुरेशी (जमाते इस्लामी हिंद), मोहसीन भाई काचवाले अँड बोहरा समाज चंद्रपूर आणि नेमकाल संस्था, किन्नर एकता मंच, एलजीबीटी संस्थांच्या पदाधिका-यांनी पाठिंबा दिला.