भावाच्या हत्येप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा

0
276

घुग्घूस : कुन्हाडीने वार करून मोठ्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीस चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ७ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. नकोडा येथे २० जुलै २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दीपक शिवानंद शर्मा ( २४ ) रा . फुकट नगर वॉर्ड , नकोडा याचा शिबू शिवानंद शर्मा या मोठ्या भावासोबत वाद झाला. या वादातून त्याने रागाच्या भरात कुन्हाडीने हल्ला करून शिबू शर्मा याची हत्या केली.

याप्रकरणी घुग्घुस पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिसांनी साक्षीपुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणात न्यायालयाने साक्षीपुरावे व वैज्ञानिक पुरावा तपासून आरोपीस सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता स्वाती देशपांडे -अंबाडे व पैरवी अधिकारी अशोक उराडे यांनी काम पाहिले.