24 तासात 20 मृत्यू तर 1224 पॉझिटीव्ह;  1026 कोरोनामुक्त

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर मनपा क्षेत्र, वरोरा, भद्रावती येथे बाधित रुग्णांचा वेगकायम, ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,712

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 20 बाधीतांचा मृत्यू झाला असून 1224 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर 1026 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मात्र चंद्रपूर मनपा क्षेत्र, वरोरा आणि भद्रावती येथे रुग्ण बाधित होण्याचा वेग अजूनही कायम आहे, दिलासादायक बातमी म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हजारापार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 56 हजार 904 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 40 हजार 344 झाली आहे. सध्या 15 हजार 712 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 68 हजार 438 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 6 हजार 641 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील जयराज नगर, तुकुम येथील 53 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला,फुले चौक परिसरातील 72 वर्षीय पुरुष, ऊर्जानगर येथील 40 वर्षीय पुरुष, 67 वर्षीय पुरुष, बिनबा वार्ड येथील 34 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, घुगुस येथील 58 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 70 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील विरुर येथील 67 वर्षीय महिला, मुल तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील वनसडी येथील 68 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील 45 वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील जामगाव येथील 48 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर येथील 68 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील 70 वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील 75 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 848 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 783, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1224 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 424, चंद्रपूर तालुका 65, बल्लारपूर 95, भद्रावती 143, ब्रम्हपुरी 50, नागभिड 42, सिंदेवाही 22, मूल 00, सावली 44, पोंभूर्णा 04, गोंडपिपरी 27, राजूरा 59, चिमूर 94, वरोरा 109, कोरपना 26, जिवती 07 व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.