सिंदेवाहीच्या गट विकास अधिका-यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकारी यांचे लेखी तक्रारीवरून गटविकास अधिकारी श्री कुणाल उंदिरवाडे यांचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल.

सिंदेवाही तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकारी यांना गटविकास अधिकारी श्री कुणाल उंदीरवाडे यांनी स्वतःचे कार्यालयात बोलावून त्यांचा विनयभंग करून त्यांना मानसिक त्रास दिल्याची लेखी तक्रार पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली.

प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे गटविकास अधिकारी यांचे विरोधात भा द वि कलम 354 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय नेरकर करीत आहेत.