• घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रातील PHC चा प्रकार !
• तो मेसेज टेकनिकल एररमुळे : डॉ. वाकदकर यांची स्पष्टोक्ती
चंद्रपूर : सध्या कोरोना विषाणूची लागण झाली की नाही हे तपासण्यासाठी अँन्टेजेन आणि आरटीपिसीआर चाचणी करण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीची ही चाचणी झाली तर त्यांना चाचणी अहवाल येईपर्यंत होम आॅयसोलेट राहण्याचा सल्लाही दिल्या जातो, परंतु चाचणी न करताच एखाद्या व्यक्तीला आपले सॅम्पल कलेक्शन झाल्याचा आणि होम आॅयसोलेट राहण्याचा मॅसेज मोबाईल वर येत असेल आपला विश्वास बसणार नाही. परंतु चंद्रपुरातील घुग्घूस मागील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका व्यक्तीला चाचणी न करताच आपले सॅम्पल कलेक्शन झाले असून आपण चाचणी अहवाल येईपर्यंत होम आॅयसोलेट राहण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अखेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिका-यांनी हा प्रकार टेक्निकल ऐररमुळे आल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. परंतु या मॅसेजमुळे त्या व्यक्तीला चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.
घुग्घूस येथील वेकोलीच्या इंदिरा नगर वसाहतीत राहणारे वैभव कवडुजी ठाकरे हे 27 एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रकृती ठीक वाटत नसल्याने कोरोनाची आरटीपासीआर (RTPCR) टेस्ट करण्यासाठी गेले मात्र त्यादिवशी टेस्ट झाली नाही. परंतु त्यांना नोंदणी करण्यास सांगण्यात आल्याने त्यांनी नोंदणी केली. आणि त्यांना दूस-या दिवशी म्हणजे आज बुधवारी 28 एप्रिलला आपण या सकाळी 11: 30 वाजता तुमची टेस्ट केल्या जाईल असे सांगण्यात आले. त्यामुळे वैभव घरी परत आला. मात्र आज 28 तारखेला सकाळी साडे दहा वाजता वैभव चाचणी करण्याला जाण्याच्या अगोदरच त्याच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवर एक मेसेज आला. यात तुमचे सॅम्पल कलेक्ट झाले असून ते शासकीय वैद्यकीय कॉलेज येथे पाठविण्यात आले आहे. आपण चाचणी अहवाल येईपर्यंत घरीच राहावे अशा आशय इंग्रजी लिहीला आहे. या प्रकारामुळे त्याला धक्काचबसला. आपण सॅम्पल न देताच आपल्याला मेसेज कसा काय येतो ? असा प्रश्न त्याला पडला.
त्याने थेट मप्राथमिक आरोग्य केंद्र गाठले,परंतू त्याला उपस्थित महिला कर्मचारीवर्गाने समाधानकारक उत्तर दिले नाही.
अखेर त्याने माध्यमापूढे येवून हा प्रकार सांगितला. सदर व्यक्ती सोबत माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदकीय अधिकारी वाकदकर यांच्याशी भेट घेतली. त्यांनाहा घडलेला हा प्रकार सांगितला. त्यांनी लगेच या प्रकाराची दखल घेऊन याचे कारण शोधले असता, त्टेकनिकल एररमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. ही समस्या वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली असल्याचे सांगितले. कुणाची नोंदणी झाली असेल आणि चाचणी करताच असे मॅसेज आले असेल नागरिकांनी घाबरून न जाता प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावे असे आवाहन केले.
आरोग्य विभागाच्या सॉफ्टवेअर मधील टेक्निकल प्रॉब्लेममुळे ही समस्या उद्भवली असली तरी वैभवने वेळीच लक्षात आणून दिल्याने नागरिकांना होणारा त्रास कमी झालेला आहे.
संपर्क साधावा आम्ही त्यांचे निराकरण करू व त्यांची व्यवस्थित चाचणी केल्या जाईल असा विश्वास व्यक्त केला