चंद्रपूर : दारूबंदी उठविण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हावासींना दिलेला शब्द अखेर पूर्णत्वास आणला. काल, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय झाला आणि जिल्ह्यातील लिकर असोसिएशनमध्ये आनंदाची लाट पसरली. शुक्रवारी आज पालकमंत्री जिल्ह्याच्या दौèयावर असताना सिंदेवाही येथे लिकर असोसिएशनच्या पदाधिकाèयांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत करीत आभार मानले.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षांपूर्वी दारूबंदीचा निर्णय लागू करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील लिकर असोसिएशनने अनेकदा पत्रव्यवहार करून दारूबंदी उठविण्याची मागणी शासनाकडे केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या मंत्रिमंडळात विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उघडपणे जिल्ह्याची दारूबंदी उठविण्याची घोषणा केली होती. या निर्णयाला खासदार बाळू धानोरकर यांनीसुद्धा समर्थन दर्शविले होते.
त्यानंतर जिल्हाधिकाèयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित झाली. या समितीने जिल्ह्यातील नागरिकांकडून तक्रारी मागविल्या. यानंतर शासनाने पुन्हा एक समिती गठित केली. या समितीनेसुद्धा दारूबंदीचा अभ्यास केला. या समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर मंत्रिमंडळात दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रमुख भूमिका राहिली आहे.
त्यामुळे शुक्रवारी लिकर असोसिएशनचे गुरुजितqसह उर्फ चिंटू गडोक, भालचंद्र आडवानी, अनूप पोरेड्डीवार, विलास नेरकर, व्यंकटेश बारसुनीवार, बबलू सलुजा, नीतू भाटिया, राजू मारकवार, चंदू जयस्वाल यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सिंदेवाही येथे भेट घेऊन स्वागत केले. यासंदर्भात येत्या आठ दिवसांत शासन निर्णय निघणार असल्याची माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.