पुराच्या पाण्यात महामंडळाची बस गेली वाहून… दोन प्रवाशांचा मृत्यू तर बसचालकास काही प्रवाशी बेपत्ता

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

यवतमाळ : पुसद-उमरखेड रस्त्यावरील दहागाव पुलावरून पाणी वाहत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पुलावरून नाल्यात कोसळली. यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून बस चालकासह काही प्रवासी बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

मागील दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच मंगळवारी सकाळी नागपूर आगाराची एमएच १४ बी.टी.५०१८ या क्रमांकाची बस उमरखेड येथून काही प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती.

या मार्गावर दहेगाव नाला असून त्यावर मोठा पूल आहे. दोन दिवसांपासून या पुलावरून पाणी वाहत आहे. असे असताना बस चालकाने नाल्यावरून बस काढण्याचा प्रयत्न केला. परिसरात असलेल्या नागरिकांनी बसला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने दुर्लक्ष केले.