शहरातील समस्या शक्य तितक्या लवकर सोडवू : सी.ओ – आर्शिया जुही

समस्याग्रस्त महिलांची नगरपरिषदेला भेट

घुग्घुस : येथील वॉर्ड क्रं दोन येथील तुकडोजी महाराज स्मारक परिसरात तलाव असून याठिकाणी नाल्या उघड्या असल्याने नागरिकांना प्रचंड घाणीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. गटारीतील घाणी मुळें डेंगू, मलेरिया, व अन्य आजार होत असल्याने सौ.संगीता बोबडे यांच्या माध्यमातून सदर महिला नगरपरिषद येथे आपल्या समस्या घेऊन आले.

अमराई वॉर्डातील बोरिंग दुरुस्ती,झाडी – झुडूप सफाई व सार्वजनिक नळाला तोट्या लावण्याच्या मागणीला घेऊन सौ. यास्मिन सैय्यद यांच्या माध्यमातून महिला नगरपरिषदेला आल्या. यासह सार्वजनिक पथदिवे लावणे, कचरागाडी नियमित पाठविणे, कचराकुंडी स्वच्छ करणे आदी मागण्यांसाठी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेची मुख्याधिकारी आर्शिया जुही यांना निवेदन देण्यात आली. व समस्यां निवारणासाठी चर्चा करण्यात आली.

सदर समस्याग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देऊन समस्या समजून शक्यतो सर्व समस्यां सोडविण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले. याप्रसंगी घुग्घुस शहर काँग्रेस महिला अध्यक्ष सौ. विजया बंडीवार, सौ.संगीता बोबडे, सौ.यास्मिन सैय्यद, सौ.रेखा रेगुंडवार, सौ.शीला धोबे, कातकर ताई,काळे ताई,नीता मालेकर,सुनीता श्रीवासकर,तारा बोबडे, लंडके ताई, सौ.वृंदा कोंडे, सौ.अनिता मुंढे, सौ.अरुणा गोगला, सौ. उंदिरवाडे ताई, सौ.शीला धोबे, सौ.मिना कार्लेकर व मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.