चंद्रपूर 1741 पॉझिटिव्ह तर 29 मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• दोन दिवसांनंतर परत वाढला मृत्यूचा आकडा
• चंद्रपूर मनपा क्षेत्र, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल, वरोरा येथे रुग्ण वाढीचा वेग कायम
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात उच्चांकी 1741 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 29 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. तर 1064 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दोन दिवस पॉझिटीव्ह आणि मृत्यूचा आकडा कमी झाला होता मात्र आज गुरुवारी परत बाधितांचा उच्चांकी आकडा समोर आला. तसेच मृत्यू संख्येत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 58 हजार 645 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 41 हजार 408 झाली आहे. सध्या 16 हजार 360 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 73 हजार 004 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 9 हजार 565 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील नगीनाबाग येथील 63 वर्षीय पुरुष, 53,60 व 68 वर्षीय पुरुष, लालपेठ कॉलनी परिसरातील 50 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 45,55 व 67 वर्षीय महिला, रामनगर परिसरातील 55 वर्षीय महिला, अरविंद नगर येथील 84 वर्षीय महिला, सरकार नगर येथील 50 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, वायगाव येथील 60 वर्षीय पुरुष, 70 व 87 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 55 वर्षीय महिला,विसापूर येथील 60 वर्षीय महिला. 65 वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील 45 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 50 ‌व 52 वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष, सरडपार येथील 65 वर्षीय महिला, आडेगाव येथील 43 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 49 व 57 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 877 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 812, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1741 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 497, चंद्रपूर तालुका 142, बल्लारपूर 104, भद्रावती 106, ब्रम्हपुरी 121, नागभिड 39, सिंदेवाही 116, मूल 123, सावली 39, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 45, राजूरा 98, चिमूर 50, वरोरा 128, कोरपना 87, जिवती 15 व इतर ठिकाणच्या 20 रुग्णांचा समावेश आहे.