चंद्रपूर लिकर असोसिएशनने खासदार व आमदार धानोरकरांचे मानले आभार

चंद्रपूर : दारूबंदी उठविण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हावासींना दिलेला शब्द अखेर पूर्णत्वास आणला वडेट्टीवार मंत्री झाल्यानंतर जिल्ह्याचा पहिल्याच दौ-यात दारुबंदी उठवनार असल्याचे संकेत दिले होते तेव्हा खासदार बाळु धानोरकर सुद्धा त्याचा सोबत होते. जिल्ह्याची गुन्हेगारी कमी करण्यासाठी दारुबंदी उठवावी यासाठी धानोरकर हे नेहमीच आग्रही होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय झाला आणि जिल्ह्यातील लिकर असोसिएशनमध्ये आनंदाची लाट पसरली. आज सकाळी वरोरा येथिल त्यांचा निवासस्थानी जाऊन
लिकर असोसिएशनच्या पदाधिकाèयांनी खासदार बाळु धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेत पुष्पगुच्छ देत त्यांचे आभार मानले. यावेळी
लिकर असोसिएशनचे गुरुजितसिंह उर्फ चिंटू गडोक, भालचंद्र आडवानी, अनूप पोरेड्डीवार, विलास नेरकर, व्यंकटेश बारसुनीवार, बबलू सलुजा, नीतू भाटिया, राजू मारकवार, चंदू जयस्वाल विलास नेरकर सुधिर मिश्रा उपस्तीत होते