पोलीस कोठडी आरोपी मृत्यू प्रकरण : पोलीस निरीक्षकांसह 3 जणांना अटक, एक जण फरार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

एकाचवेळी पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे

गोंदिया : आमगाव पोलीस कोठडीत आरोपी मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षकांसह 3 पोलिसांना भादवी कलम 302 खाली अटक करण्यात आली आहे. तर एक पोलीस उपनिरीक्षक अटकेच्या भीतीने फरार आहे. पोलिसांवर खूनाचा दाखल करून अटक करण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे पोलीस विभागात उडाली खळबळ उडाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कुंभारटोली येथील अनेक गुन्ह्या प्रकरणी राजकुमार अभयकुमार धोती याला अटक करण्यात आली होती. आमगाव कोठडीत पोलिसांनी राजकुमारला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला होता. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे सीआयडीत तपासात सिद्ध झाले होते.

या प्रकरणात तपासाअंती पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक सह पाच पोलीसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. एकाचवेळी पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे.

या प्रकरणात तपासाअंती पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक सह पाच पोलीसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. एकाचवेळी पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण?

२० मे रोजी आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कुंभारटोली जिल्हा परिषद शाळेत 3 चोरटयांनी दरोडा घातला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तीन आरोपींना अटक करीत २१ मे रोजी आमगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. माझ्या भावाला बेदम मारहाण केली असून त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या बहिणीने केला होता. दरम्यान, मृत राजकुमार याच्या शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचे उघडकीस आले असून, अमानुषपणे मारहाण केल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झाले आहे.