चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रत्यक्ष भेट घेत दिले निवेदन
चंद्रपूर : गेल्या काही दिवसापासुन निधी अभावी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पथदिव्यांचे विज बिल थकीत असल्याकारणाने चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा महावितरण कंपनीतर्फे खंडित करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात संपूर्ण ग्रामीण भाग हा अंधकारमय झालेला दिसून येत आहे.
ग्रामपंचायतीचे उत्पनाचे स्त्रोत कमी असल्यामुळे थकीत विज बिले भरण्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायत असमर्थ आहे. निधी अभावी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पथदिव्यांची विद्युत जोडणी करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी DPDC अंतर्गत निधीची तरतूद करावी अशी मागणी चंद्रपूर विधानक्षेत्राचे आ. किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
मागील दिवसात चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील काही ग्रामपंचायत सरपंच यांनी आ. किशोर जोरगेवार यांना पथदिव्यांच्या विज बिल करिता निधीची तरतूद करण्याची मागणी केलेली होती त्या अनुषंगाने आ. जोरगेवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रत्यक्ष भेट घेत चर्चा केली व थकीत विज बिल निधीची लवकरच व्यवस्था करून खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणीचे निवेदन केले.