कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यात सध्या बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आक्सिजनभावी लोकांना आपला प्राणा गमवाव लागला आहे. एकीकडे कोरोनामुळे बळी जात असताना वयाची शंभरी पार केलल्या अनेकांनी कोरोनाला हरवल्याच्या सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. आता मुंबईतील 102 वर्षीय सुशीला पाठक यांनी कोरोनावर मात केली आहे.
अनेकांच्या मनात कोरोनाची भीती बसली आहे. पण ही भीती तुम्हाला कोरोनावर मात करु देणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कोरोनाला घाबरलात. तर तुमच्यावर कोणत्याही उपचारांचा परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही कोरोनाला घाबरु नका. त्याच्याशी दोन हात करा. तुम्ही नक्की त्यातून बरे व्हाल, असं कोरोनावर मात केलेल्या 102 वर्षीय सुशीला पाठक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. मात्र राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.