राज्यातील लॉकडाऊनमध्ये 15 दिवसांची वाढ; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. त्याचा कालावधी संपत आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधत आणखी 15 दिवसांसाठी निर्बंध कायम करण्यात आले असल्याची माहिती दिली.

दरम्यान, भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी बंधने पाळल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले. तसेच तौते चक्रिवादळात नुकसान झालेल्यांना मदत देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.