पावसाळ्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचं डाॅक्टरांना आवाहन म्हणाले…

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

कोरोनानं देशभरात हाहाकार माजवला आहे. यातच आता पावसाळा सुरु होतोय. पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती जास्त वर्तवली जात आहे. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते आज मुंबईत महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलच्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

यावेळी पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात, त्यांची काही लक्षणं आणि कोविडची लक्षणं एकसारखी असतात त्यामुळं डॉक्टर्सनी त्यांच्याकडं येणाऱ्या रुग्णांमधील कोविडची लक्षणं वेळीच ओळखावीत. तसंच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत किंवा नाही ते बारकाईनं पाहावं अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोरोना आजाराबाबत आता अधिक सतर्क राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे असं सांगताना कोरोनाचा अंगावर अजिबात काढू नका असं आवाहन केलं आहे. “कोरोना हा आजार अजिबात अंगावर काढू नका. हा आजार इतर आजारांसारखा नाही. वेळीच उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणतंही औषध घेऊ नका”, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषदने आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन करताना बोलत होते. कोविडच्या लढाईत आता डॉक्टर्स देखील मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरले आहेत त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले.