लेखा परीक्षणात महानगरपालिकेतील दोनशे कोटींच्या कामावर आक्षेप

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : शहर महानगरपालिकेचा महापौर राखी कंचर्लावार व तत्कालीन आयुक्त सुधीर शंभरकर याच्या २०१५ ते २०१६ या एक वर्षांतील कार्यकाळाचे लेखापरीक्षण केले असता २०० कोटी ३३ लाखांच्या कामांबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. या काळातील एकूण १५ कामात अनियमितता व ७१ कामांवर आक्षेप घेण्यात आले आहे. तसेच कंत्राटदार, कॅन्सलटन्ट एजन्सी व कर्मचारी यांना अतिरिक्त दिले गेलेले ३० कोटी ३९ लाख रुपये वसूल करावे, असेही या लेखापरिक्षणात म्हटले आहे.

दरम्यान, हा आक्षेप व अनियमितता नोंदवण्यात आलेला लेखापरीक्षण अहवाल ३१ मे रोजी आयोजित आमसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेने २०१५ ते २०१६ मध्ये १२३ कोटी ८२ लाख ३१ हजार ९५७ रुपयांचा शासकीय निधी अखर्चित असून शासनाकडे जमा केला नाही. नवीन खांबाच्या एस.टी. लाइन पथदिव्यांसह विद्युतीकरणाच्या कामात ८ लाख ९० हजार कंत्राटदाराला अतिरिक्त रक्कम प्रदान केली गेली. कर विभागाचे काम संग्रहित करण्याचे अनुषंगाने कोअर प्रोजेक्ट कंपनीसोबत करार केला असून, अटी व शर्थीनुसार ५० लाख ९४ हजार शासन खाती भरणा न केल्याने शासनाचे नुकसान केले.

बांधकामातील गौण खनिजाच्या खनिकर्म विभागाची मेळ न घालणे, कंत्राटदारांना विनादंड मुदत वाढ देणे, निविदा सादर करण्यास पुरेसा वेळ न देणे, नगररचना विभागाचा कर आकारणीच्या दृष्टीने कर विभागाशी आकारणीच्या दृटीने कर विभागाशी समन्वय नाही. अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त न करता नकाशे मंजूर करणे इत्यादी महसुलाची मोठ्या प्रमाणावर थकबाकी, कर विभागातील कामात त्रुटी, कंत्राटदाराचे मंजूर दर हे सेवकारसह असताना देयकात पुन्हा सेवाकर प्रदान करण्यात आले. त्यामुळे कंत्राटदाराला ३ लाख ३८ हजार अतिरिक्त प्रदान केले आले. महापालिकेच्या रोख व मौल्यवान वस्तू हाताळणाèया कर्मचाèयाकडून क्षतिपूर्ती बंद न घेणे, २०१५ तें २०१६ या वर्षांत ६ कोटी ७७ लाख ३५ हजार ६८३ रकमांचे व्यवहार केल्याचे दिसून येत आहे. यावरी आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.