तस्करांकडून जप्त केलेल्या स्टार कासवांनी राजुरा वनक्षेत्रातील जंगलात घेतला सुटकेचा श्वास

 पुणे वनविभागात वेगवेगळ्या कारवाईत हस्तगत केलेले होते स्टार कासव

चंद्रपूर : पुणे वनविभागात वेगवेगळ्या कारवाईत तस्करांकडून जप्त केलेल्या 120 स्टार कासवांना मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा वनक्षेत्रात नैसर्गिक अधिवासात काल शुक्रवारी (29 आॅक्टोबर 2021) रोजी सोडण्यात आले.

पुणे वनविभागात वेगवेगळ्या कारवाईत तस्करांकडून जप्त केलेल्या 120 स्टार कासव जप्त करण्यात आले.
हे सर्व कासव वनविभागाचे मार्गदर्शनात पुणे येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यू संस्थेच्या सदस्यांनी विशेष वाहनांनी राजुरा येथे आणले. त्याची पूर्णपणे चिकित्सा करून काल शुक्रवारी राजुरा वनक्षेत्रातील जोगापूर वनक्षेत्रात सोडण्यात आले. यावेळी पुणे येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यू चे सदस्य,राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, क्षेत्रसाहायक प्रकाश मत्ते,संतोष संगमवार,वनरक्षक सुनील मेश्राम,चंदेल,गाजलवार उपस्थित होते.

या प्रजातीच्या कासवांचा केवळ विदर्भातील राजुरा परिसरातील वनक्षेत्रात नैसर्गिक अधिवास आहे. या कासवाचा अंधश्रद्धेपोटी वेगवेगळ्या कारणांसाठी तसेच अर्थ कारणासाठी तस्कर वापर करतात. पुणे वनविभागात तस्करांकडून तब्बल 120 कासव वेगवेगळ्या कारवाईत हस्तगत करून त्यांचे जिव वाचविण्यात आले. काल शुक्रवारी क्षणांनी राजुरा वनपरिक्षेत्रात सुटकेचा श्वास घेतला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे या जंगलात स्टार कासवांना सोडण्यात आले आहे. त्यांचाही मुक्त संचार राजुरा वनपरिक्षेत्रातील जंगलात सुरू आहे.आणि त्यानंतर पुन्हा तब्बल 120 कासवांना या ठिकाणी जिवदान दिले आहे.