आजी सोबत असलेली चार वर्षीय नात वर्धा नदीत वाहुन गेली

वढा येथील मन हेलावणारी घटना

घुग्घुस (चंद्रपूर) : शहरा जवळील विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले वढा तीर्थक्षेत्र येथील कांता बाई ह्या वर्धा नदीवर कपडे धुण्यासाठी आज दुपारी तीन वाजता गेल्या होत्या त्यांच्यासोबत त्यांची चार वर्षीय नात कस्तुरी ओमदेव गुरनुले ही सुद्धा गेली होती.

आजी कपडे धुण्यात व्यस्त असतांना काठावरून नदीच्या आत शिरलेली कस्तुरी नदीप्रवाहात वाहून गेली.

या घटनेमुळे वढा येथे एकच खळबळ उडाली सदर घटनेची माहिती घुग्घुस पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून कस्तुरीचा शोध घेणे शुरू असून
अजून पर्यंत कस्तुरीचा मृतदेह मिळाला नाही.