• चिमूर लालुकयातील मोटेगाव येथील घटना
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथे गावाला लागून असलेल्या झुडपी जंगलामध्ये अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या वणव्यामुळे आग उग्ररूप धारण करीत थेट गावाच्या दिशेने झेपावली. या आगीत मोटेगाव येथील चार घरे जळून खाक झाली. ही आज बुधवारी भरदुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
आज बुधवारी भरदुपारच्या सुमारास मोटेगाव गावलगतच्या झुडपीजंगलामध्ये अज्ञात व्यक्तींनी वणवा लावला. वणवा हळूहळू झुडपीजंगलामध्ये पसरत थेट गावाच्या दिशेने झेपावला. आगीने उग्ररूप धारण केल्याने या जंगलाला लागून असलेल्या पाच घरांना घेरले. वेळ दुपारची असल्याने आणि हवेचा रूख असल्याने आग गावाच्या दिशेने झेपावत चार घरांना आगीच्या विळख्यात घेतले. बिरजू नेवारे, सुधाकर शेंडे, मंगेश नेवारे, राजू अडसोडे, बंडू नान्हे, यांचे घरे जळून खाक झाल्याने या कुटूंबियांचे जीवनाउपयोगी वस्तू जळाल्या. यात लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच याच परिसरात शेतकऱ्यांनी ठेवलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यांना आगीने आपल्या कवेत घेतले. ते ढिगारेही जळहून खाक झालीत. सदर आगीने रोद्ररूप धारण केल्याने नागरिकांनी आग आटोक्यात आण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
लगेच प्रशासनाला अग्निशाम दलासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आयला. चिमूर आणि नागभीड येथील अग्निशामक दलाच्या दोन गाड्या मोटेगाव येथे बोलवून आग विझविण्यात आली. मात्र तो पर्यंत घरे आणि जनावारांचा चारा आगीच्या जळून खाक झाला होता. सदर माहिती प्रशासनाला होताच चिमूरचे तहसीलदार यांनी घटनास्थळ गाठले. जळालेल्या घरांची पाहणी करून त्यांचा पंचनामा करण्यात आला. नागरिकांनी वेळीच समयसुचकता दाखविल्याने आग गावात इतरत्र पसरली नाही. आगीच्या घटनेत जीवीत हानी झाली नाही. मोटेगाव परिसरात लावलेल्या वनव्याने जंगलाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येवून पहाणी केली. चे कर्मचारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते.