गुप्ता पॉवर प्लांटमध्ये आग

0
407

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून आगीच्या घटनांत वाढ झाली आहे. अनेक महत्वाच्या ठिकाणी आग लागल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. यातच घुग्घुस मधील गुप्ता पॉवर प्लांट मध्ये आज बुधवारी, दुपारी १२ वाजता अचानक आग लागली. यात प्लांटमधील झाडे जळून खाक झाली.

या घटनेची माहिती व्यवस्थापनाने पोलिसाना दिली. एसीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. यावेळी घुग्घुस पोलीस उपस्थित होते. हि आग वाढत्या उन्हामुळे लागल्याची माहिती आहे. या आगीत मोठे नुकसान टळले.