मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना झापलं | विचारले अनेक गंभीर प्रश्न

0
235
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे आहेत. परमबीर सिंग यांचे वकील विक्रम ननकानी बाजू मांडत आहेत. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी सुरु झाली आहे.

सुनावणी दरम्यान एफआयआर कुठे आहे? फौजदारी स्वरुपाच्या प्रकरणामध्ये तपास करायचा असल्यास प्रथम एफआयआर दाखल करणं आवश्यक आहे. या प्रकरणी एफआयआर कुठे आहे, अशी विचारणा मुख्य न्यायमूर्तींकडून परमबीर सिंहांच्या वकिलांना करण्यात आली. त्यावेळी पारदर्शक आणि योग्य तपास व्हायचा असेल तर राज्याबाहेर हलवण्यात यावा, कारण महाराष्ट्रामध्ये राज्याच्या सीबीआयला परवानगीशिवाय तपास करता येत नाही, अशी मागणी परमबीर सिंह यांच्या वकिलांनी केली.

तसेच सुनावणीत दरम्यान राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडणारे अ‌ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी परमबीर सिंह हे “असंतुष्ट” फिर्यादी असल्याचं न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जे आरोप करत आहात त्याचा पुरावा काय? गृहमंत्र्यांकडून पैशांची मागणी केली जात असताना वा पैसे जमा करण्यास सांगितले जात असताना तुम्ही स्वतः तिथे होता का? अशी विचारणा करत तुमच्या आतापर्यंतच्या म्हणण्यावरून तुम्ही केलेले आरोप ऐकीव महितीवर आधारित आहेत, असेही कोर्टाने सुनावले.

“तुम्ही पोलीस आयुक्त आहात…तुमच्यासाठी कायदा बाजूला का ठेवायचा? पोलीस अधिकारी, मंत्री आणि राजकारणी कायद्यापेक्षा मोठे आहेत का? स्वत:ला इतके मोठे समजू नका, कायदा तुमच्यापेक्षा मोठा आहे,’ असंही हायकोर्टाने यावेळी खडसावलं.