भद्रावती (चंद्रपूर) : महामार्ग पोलीस चंद्रपूरच्या विद्यमाने कोंढा फाटा महामार्ग पोलीस चौकीजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र खैरकर यांचे मार्गदर्शनात दि.३० ऑक्टोबरला महामार्गाने ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी व जड वाहनधारकांना थांबवून रहदारीविषयी तसेच वाहतुकीविषयीच्या नियमांचे वेळीच पालन करावे व दुचाकी वाहन चालकांना नेहमीच दुचाकी चालवीत असतांना हेल्मेट लावण्याची कळकळीची विनंती केली.
जेणेकरून अपघात घडल्यास आपला जीव धोक्यात येणार नाही व आपल्याला सुरक्षित राहता येणार असे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मोरे यांनीबयावेळी आवर्जून सांगितले.
याबाबत दिवसभर मार्गदर्शन करून प्रबोधन केले. याप्रसंगी महामार्ग पोलीसचे हिरालाल वेलथेरे, प्रशांत देरकर, हवालदार खोब्रागडे, निमय राय, राजेंद्र यादव, विनोद कुळमेथे ही चमू आपले कार्यपार पाडत होती. यावेळी असंख्य वाहनधारक उपस्थित होते.
 
                                          
                                          
                                          
                                          


                                          
                                          
                                          
                                          

                      

