शासकीय सभागृह नगरपरिषदेच्या स्वाधीन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

जिल्हापरिषदेचा ठराव पालकमंत्र्यांनी केला रद्द

घुग्घुस (चंद्रपूर) : येथील वॉर्ड क्रं 06 मधील शासकीय इमारतीचे निर्माण हे वर्ष 2014 – 2015 साली करण्यात आले होते. व निर्माणा नंतर ही इमारत ग्रामपंचायतला हस्तांतरीत करण्यात आली.
तेव्हा पासून ही इमारत भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष यांचे भाऊ हे व्यवसायीक कराटे शिकवणी वर्गा करिता करीत होते. घुग्घुस ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपरिषदेत झाल्यानंतर सदर इमारतीचे अवैध वापर बंद करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती.

मागणीची दखल घेत तहसीलदार निलेश गौड यांनी सदर इमारत सील करून नगरपरिषदेच्या ताब्यात दिली. सध्या जिल्हापरिषद मध्ये भाजपाची सत्ता असल्याने सदर इमारत जिल्हा परिषदच्या ताब्यात ठेवण्याचा ठराव हे 29 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हापरिषद येथे घेण्यात आला.

आज या सभागृहा संदर्भात चंद्रपूर नियोजन भवन येथे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडे मंजुरी करिता बैठक घेण्यात आली यामध्ये पालकमंत्र्यांनी सदर इमारत जिल्हा परिषदेला देण्यास मनाई केली व सदर इमारत नगरपरिषदेच्या ताब्यात दिली असून लवकरच येथून घुग्घुस नगरपरिषदेचे कार्य शुरू होणार आहे.

ही इमारत नगरपरिषदेच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी भाजप नेत्यांनी शर्तींचे प्रयत्न केले मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही.