वरोरा तालुका पेन्शनर्स च्या आमसभेत नविन कार्यकारिणी ची निवड

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

अध्यक्ष पदी देवाळकर, सचिव पदी कांबळे

वरोरा (चंद्रपूर) : वरोरा तालुका पेन्शनर्स बहुउद्देशीय असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण आमसभा चे आयोजन मा.सहाय्यक धर्मदाय आयुक्त नं.१चंद्रपूर यांच्या आदेशानुसार श्री अंबादेवी देवस्थान ,अंबादेवी वार्ड वरोरा येथे करण्यात आले होते.त्यात १५ नविन संचालक मंडळाची अविरोध निवड करण्यात आली. त्यात आबासाहेब देवाळकर यांची अध्यक्षपदी तर सचिव पदी देवराव कांबळे यांची अविरोध निवड करण्यात आली.आमसभेचे अध्यक्षस्थानी व्ही.जी.सोनेकर ऊपस्थीत होते.

वार्षिक आमसभेत २४ आक्टोबर २१ ते २३ आक्टोबर २०२६पर्यंतची नवीन कार्यकारी मंडळाची निवडणूक घेण्यात आली. त्यात सहाशे अठ्ठेचाळीस सभासद मतदारांनी भाग घेतला. संस्थेचे कार्यकारी मंडळात पंधरा सदस्यांची अवरोध निवड करण्यात आली. त्यात प्रामुख्याने ऊपाध्यक्ष पदी तुळशिराम विरूटकर, सहसचिव पदी श्रीमती वनमाला संतोष बरके, कोषाध्यक्ष पदी देवराव पारखी याशिवाय संचालक सदस्य पदी दिनकर राऊत, सुरेश बरबटकर ,सिताराम पाल, वसंतराव माणूसमारे, प्रकाश गिरसावळे ,पांडुरंग वरभे, पदमाकर खापणे, श्रीमती कुसुमताई जोगी, श्रीमती शशिकला पोईनकर, सौ.दुर्गा रमेश ठाकरे यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून महेश डोंगरे तथा निवडणूक सहाय्यक अधिकारी म्हणून गोविंद रजपूत यांनी कामकाज सांभाळले.सर्व नवनिर्माण संचालक मंडळाचे आमंसभेतील सदस्यांनी अभिनंदन केले.

आमसभेत दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. सभासदांच्या समस्या लक्षात घेऊन त्या यावर चर्चा करुन निराकरण करण्यात आले. आमसभा यशस्वी करण्यासाठी देवराव कांबळे, नामदेव काळे,वनमाला बरके, एम.के.मगरे, सांबशीव गारघाटे,अशोकुमार पाठक, श्रीमती अजंना पुसदेकर, श्रीमती लीला लोणारे, श्री.अ.ग.बुराणसर, रा.तु.पावडे, ए.बी.शेख,व संघटनेच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.