चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून घुग्घुस नगरपरिषदेची मागणी शासन दफ्तरी धूळखात होती.अधिसूचना निघत होत्या मात्र त्या शेवटच्या टोकापर्यंत जाता – जाता केराच्या टोपलीत हेतुपूर्वक पडल्या जात होत्या, विरोधात असतांना नगरपरिषदेची मागणी करायची सत्तेत येताच त्यामागणीला धुळकाऊन लावायचं हे श्रेयाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांचा दुटप्पीपणा आहे.
गेली पांच वर्ष गल्ली पासून दिल्ली पर्यंत एकहाती सत्ता असतांना श्रेय घेणाऱ्यानी नगरपरिषद का केली नाही ?
असा संतप्त प्रश्न वड्डेटीवार यांनी केला. राज्यात एकावर्षांपूर्वी महाविकास आघाडीची सत्ता आली आणि मी पालकमंत्री झालो तेव्हापासून मी व माझे अधिकारी सतत पाठपुरावा करीत होते. कोरोनाच्या महामारीमुळे तसेच जिल्हापरिषदेच्या दफ्तर दिरंगाई मुळे नगरपरिषदेला थोडा उशीर झाला.
28 आगस्ट 2020 रोजी घुग्घुस नगरपरिषद होणार असल्याची माहिती दिली 31 आगस्ट रोजी नगरपरिषदेची प्रथम अधिसूचना जाहीर झाली. केवळ चार महिन्यातच 31 डिसेंम्बर 2020 रोजी घुग्घुस नगरपरिषद झाल्याचे मी जाहीर केले. काही गल्लीतले जमिनी हडपणारे नेते सांगत आहे हे नेत्यांचे श्रेय नाही.
त्या मुर्खाना मी सांगू ईच्छीतो की हे नेताच करतो घुग्घुस नगरपरिषदेचा श्रेय हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री, नगर विकास मंत्री, खासदार, आमदार या सर्वांचे आहे. अशी माहिती आज 3 जानेवारी रोजी चंद्रपुर विश्रामगृहात आलेल्या पालकमंत्री यांनी दिली.
एका दिवसात तीन – तीन मंत्र्यांची स्वाक्षरी घेणे काय गंमत वाटते ? असा ही उपरोधक टोला ही लगावला.
याप्रसंगी प्रकाश देवतळे जी ग्रामीण जिल्हाध्यक्ष, रितेश (रामू तिवारी) शहर जिल्हाध्यक्ष, रोशन पचारे किसान सेल जिल्हाध्यक्ष, पवन आगदारी एस.सी. सेल जिल्हाध्यक्ष, सैय्यद अनवर कामगार नेते, शामराव बोबडे ज्येष्ठ नेते, सौ. रंजीता आगदारी माजी पंचायत समिती सदस्या, सौ.संगीता बोबडे, सौ.पद्मा त्रिवेणी, सौ. संध्या मंडल, सौ.रेखा रेंगुंडवार, श्रीमती दुर्गा पाटील,सुरज कन्नूर युवक सचिव, कल्याण सोदारी,अजय उपाध्ये, सिनू गुडला, बालकिशन कुलसंगे, जावेद कुरेशी,शहजाद शेख,सुरज बहुराशी, रमेश रुद्रारप, सचिन कोंडावार, रोशन दंतालवार, नुरूल सिद्दीकी, सचिन गोगला, प्रेमानंद जोगी, बबलू मुंढे, सुनील पाटील व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.