चिमुर (चंद्रपूर) : 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2021 ला नागपुर येथील संविधान चौकात समाज क्रांती आघाडी वतीने संविधान व आरक्षण बचाव महारॅली चे आयोजन करन्यात आले आहे या रॅलीत हजारोंच्या संख्येनी सामिल व्हावे. असे आवाहन समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे यांनी रवीवार ला जुनी राष्ट्रीय शाळा येथे आयोजीत केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना केले.
प्रा. खैरे पुढे म्हणाले की, भाजपा सरकारने 2014 पासुन संविधानाला कमजोर करण्याचे प्रयत्न झपाट्याने सुरु केले आहे. संविधानातील धर्मनिरपेक्षता, सार्वभौमता, समाजवाद, गणतंत्र आणि लोकशाही या मुलभूत तत्वांचे उल्लंघन करीत आहे. संविधानाची सर्वश्रेष्ठता नाकारल्या जात आहे. शेतकर्यांच्यां आंदोलनाकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष संविधानाला अभिप्रेत जनतेचे सार्वभौमत्व नाकारण्याचे जिवंत उदाहरण होय. तसेच केंद्र सरकार कडुन एस. सी, एस. टी आणि ओबीसींच्या आरक्षणाचा अधिकार नाकारल्या जात आहे. असा आरोप याप्रसंगी प्रा. खैरे यांनी केला.
सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी समाज क्रांती आघाडीच्या महीला संघटिका छायाताई खैरे, जेष्ट कार्यकर्ते गुलाबराव खोब्रागडे, सिद्धार्थ चहांदे, भालचंद्र गायकवाड, प्रकाश चुनारकर, पांडुरंग रामटेके इत्यादिंनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आघाडीचे तालुका सचिव संभा गजभिये व आभार शहर अध्यक्ष जयंत मेश्राम यांनी मानले. मेळाव्याला प्रमोद गौरकार, आनंदराव रंगारी, गुलाब रामटेके, प्रभुदास मेश्राम, अंकुश पाटिल, देविदास रंगारी, प्रशांत चहांदे, राजु गौरकार, जनार्धन मेश्राम, जयराम बांबोडे, नामदेव शेंडे, वसंत ठवरे, सुरज ठवरे, देवराव मेश्राम, विनोद येसांबरे आदींची उपस्थिती होते