अबिद अली कडून आदिवासी महिलेची फसवणूक गडचांदूर पोलिसात तक्रार

0
64

कोरपना (चंद्रपूर) : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा येथील आदिवासी व दारिद्र रेषेखालील एकता महिला बचत गट महिलांना शासकीय योजनेच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहेत एकूण नऊ महिलांनी सय्यद अबिद अली यांच्या विरुद्ध गडचादुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहेत मौजा नांदा येथील महिलांनी 17 जुलै 2002 रोजी एकता महिला बचत गट नांदा या नावाने बचत गट स्थापन केला आदिवासी व महिलांचा बचत गट असल्याने शासकीय योजनेतून बचत गटाला झेरॉक्स मशीन व एस टी डी, पी,सी,ओ करिता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 1 लाख 55 हजार रुपयांचे कर्ज मिळालेत मात्र हा व्यवसाय चालला नाही त्या नंतर सय्यद अबिद अली यांनी गटातील महिलांची चर्चा करून व कोरपना व्यवसाय टाकून होणाऱ्या कमाईतून बचत गटांच्या कर्जाची परतफेड बँकेला करतो असे सांगत सर्व साहित्य नेल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहेत मात्र त्यांनी कर्ज परतफेड केली नाहीत बँकेकडून गटात वारंवार पैसे भरा असे सांगण्यात आल्याने बचत गटातील महिला त्रस्त झाले आहेत बचत गटातील एखादा महिलेने मानसिक तणावाखाली स्वतःचे जीवन संपवून यासाठी अबिद अली जबाबदार राहतील असे बचत गटाच्या सचिव ज्योती गजानन उईके, खलील शेख, पुष्पा मळावी, दुर्गा मारोती उईके, पंचफुला वासुदेव मडावी, सीताबाई रामा उदे , पार्वता कर्णू पेंदोर, मंदा नामदेव तोडासे, ललिता मारुती पेंदोर, यांनी तक्रारीत म्हटले आहेत

25 नोव्हेंबर 2020 रोजी एक लाख 63 हजार 343 रुपये व्याजासह भरण्याची नोटीस बँकेने आमच्या बचत गटास पाठविले बँकेची नोटिस आल्याने आम्ही 21 डिसेंबर 2020 रोजी कोरपना येथे अबिद अली यांचे घर गांठले त्या वेळेस सय्यद अबिद अली घरी नव्हते फोनवर बोलून त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीत येतो म्हणून सांगितल्यानंतरही घरी आले नाहीत आणि फोन बंद केला.
● ज्योती उईके
सचिव एकता महिला बचत गट नांदा

मी अनेक वर्षापासून एनजीओ चे काम करतो नांदा येथील बचत गटात कर्ज मिळाले झेरॉक्स एसटीडी, पीसीओचा व्यवसाय थाटला मात्र तो चालला नाही त्यामुळे एका व्यक्तीने तीन हजार रुपये महिना याप्रमाणे हा व्यवसाय आपल्या हाती घेतला आता त्या व्यक्तींचे निधन झाले आहे हे प्रकरण 2006 चे असून फसवणुकीत आपला काहीही संबंध नाहीत

● सय्यद अबिद अली कोरपणा
आदिवासी महिलांनी गडचांदूर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहेत प्रकरण चौकशीत ठेवले असून संपूर्ण प्रकरणाची तपासणी झाल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ
गोपाल भारती ठाणेदार पोलीस स्टेशन गडचांदूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here