चंद्रपूर : नागभिड तालुक्यातील मिंडाळा येथील गावालगत असलेल्या सदगुरू कृपा राईस मिलच्या ताराचे वाॅलकंम्पाऊड मध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी (२२ जानेवारी २०२१) उघडकीस आली आहे.
नागभीड पासून १० किलोमीटर अंतरावरील मिंडाळा येथे विलास गि-हेपुंजे यांचे सदगुरु कृपा राईस मिल आहे. आज शुक्रवारी सकाळी राईसमिल मालकाला ताराचे कुंपणात बिबट मृत पावलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी लगेच वनविभागाला माहिती दिली. लागलीच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मिंडाळा गावाबाहेर असलेल्या सद्गुरू राईस मिल च्या जाळ्यात बिबट अडकून मृतावस्थेत आढळले जवळच बाजूला गावठी डुक्कर सुद्धा मृत अवस्थेत आढळून आले. त्यामुळे सुरुवातीला बिबट्याने डुकरावर हल्ला करून ठार केले व नंतर डुकराच्या कळपाच्या हल्यात आपला जीव वाचविन्यासाठी पळताना ताराच्या कंम्पाऊंड मध्ये अडकला. बिबट्याचे दोन्ही पाय अडकले त्यामुळे त्याला बाहेर पडता न आल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. सदर बिबट हा एक ते दीड वर्षाच्या असून मादी आहे.
मृत बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेत उत्तरीय तपासणी साठी नागभीड येथे रवानगी केली.
दरम्यान घटनास्थळी उपवनसंरक्षक अधिकारी ब्रम्हपुरी दीपेश मल्होत्रा,सहायक वनसंरक्षक वाकडे, वनपरिक्षेत्राधिकारी गायकवाड, वनरक्षक जीवतोडे, यांची उपस्थिती होती.