फेब्रुवारी महिन्यात ‘पीआरसी’ चंद्रपुरात

0
27

• विभागप्रमुखांची धावपळ, सुट्टीच्या दिवशीही कामावर

• समिती घेणार लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालाची साक्ष

चंद्रपूर : येत्या फेब्रुवारी महिन्यात पंचायतराज समिती (पिआरसी) चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. समितीचा दौरा निश्चित झाल्यापासून जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांची धावपळ वाढली आहे. काही दिवसांपासून विभागप्रमुखांसह कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही रविवारी अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर येवून प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत.

पंचायतराज समिती येत्या ९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात येत आहे. तीन दिवस या समितीचा जिल्ह्यात मुक्काम असेल. आमदार संजय रायमुलकर अध्यक्ष असलेल्या या समितीत प्रदीप जयस्वाल, कैलास पाटील, डॉ. राहुल पाटील, अनिल पाटील, संग्राम जगताप, दिलीप बनकर, शेखर निकम, सुभाष धोटे, माधवराव जळगावकर, प्रतिभा धानोरकर, हरिभाऊ बागडे, डॉ. विजयकुमार गावित, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, डॉ. संजय कुटे, राणा जगजितqसग पाटील, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, निरंजन डावखरे, सुरेश धस यांचा समावेश आहे.

विशेष निमंत्रित म्हणून किशोर पाटील, जयंत पाटील, बाळराम पाटील आणि किशोर दराडे यांचा समावेश आहे. नऊ फेब्रुवारीला या समितीचे आगमन होईल. सकाळी दहा ते साडे या वेळेत समितीचे सदस्य जिल्ह्यातील विधान मंडळाच्या सदस्यांशी शासकीय विश्रामगृहात अनौपचारिक चर्चा करतील. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाèयांशी चर्चा करतील. त्यानंतर अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात २०१०-११ ते २०१६ ते २०१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिका-यांशी साक्ष घेतील. त्यानंतर काही पंचायत समित्यांना समिती भेट देणार आहे.

१० फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतींना भेटी देतील. पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, संबंधित अधिका-यांचे साक्ष घेतील. ११ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या २०११ – १२ ते २०१७ -१८ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य अधिकाèयांशी साक्ष घेतील. पंचायतराज समिती येणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख प्रलंबित कामे, अहवाल, रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी धावपळ करीत आहे. सुटीच्या दिवशीही रात्र उशिरापर्यंत कामे उरकणे सध्या सुरू आहे.

Twitter
WhatsApp
Telegram
Pinterest
ReddIt
Email
Linkedin
Previous articleLOCKDOWN में मुकेश अंबानी ने हर घंटे कमाए 90 करोड़ रुपए

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here