◾घुग्घुस परिसरात अवैधरित्या रेती व्यावसायाला उधाण
◾शासनाच्या करोडोच्या महसुलला चुना
चंद्रपूर : सध्या घुग्घूस परिसरात झटपट लखपती बनण्याच्या नादात अनेकांनी अवैद्य वाळू चोरीचा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे या कामी शेतोपयोगी कामासाठी घेण्यात येणारे ट्रॅक्टर, सर्रासपणे वाळूची चोरी करण्यासाठी वापरण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतीकरिता परवाना असताना वाळूचा व्यावसाय कसा? असा प्रश्न अचंबित करणारा आहे. मात्र यातून शासनाच्या करोडोच्या महसुलाला चूना लागत आहे.
घुग्घुस परिसरातील वर्धा नदी घाटातील रेती चोरी प्रकरण मागील काही दिवसांपासून गाजत असून अवैध रेती चोरी करणारे ट्रॅक्टरवर महसूल विभागाने केलेल्या कारवाईमुळे ट्रॅक्टर चालकांचे धाबे दणाणले परंतु ह्या कार्यवाही च्या दुसऱ्या दिवशीपासून तस्करांचे अवैध वाळूचे व्यवसाय पूर्ववत सुरू झाले आहे. मात्र या रेती चोरीच्या प्रकरणात ट्रॅक्टरच्या परमिट चा मुद्दा आरटीओ विभागाच्या नजरेतून सुटलेला दिसून येत आहे. किंबहुना त्याच्यांकडे कानाडोळा करण्यात येत आहे.
परिसरातील सुमारे नव्वद टक्के ट्रॅक्टर कृषीच्या वापरा करीता देण्यात येणाऱ्या परवान्यावर चालत आहेत मात्र एकाही ट्रॅक्टर कडे व्यवसायिक वापराचा परवाना नसल्याची चर्चा आहे. ट्रक्टर च्या व्यावसायिक वापराकरता असलेल्या परवान्याचा खर्च हा कृषी वापरा करिता देण्यात येणाऱ्या परवान्याचे पेक्षा खूपच कमी आहे तसेच कृषी वापरा करिता देण्यात येणाऱ्या परवान्यांचा आरटीओ टॅक्स सुद्धा नगण्य आहे.
मात्र हे ट्रॅक्टर चालक सरकारने दिलेल्या या सुविधेचा लाभ टॅक्स किंवा कर वाचवण्याकरिता करीत असून शासनाची दिशाभूल करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल अनेक वर्षापासून बुडवत आहेत.
एकंदरीत या अवैध रित्या चालणाऱ्या ट्रक्टर मुळे महसूल विभागाच्या महसुला सोबतच आरटीओचा महसूल सुद्धा बुडवण्याचा चंग या ट्रक्टर चालकांनी बांधलेला असून मोठ्या प्रमाणात शासनाच्या महसूलाला चूना लावण्याचे कार्य राजरोसपणे कित्येक वर्षापासून सुरू आहे. मात्र एवढे असून सुद्धा आरटीओ विभागाचे अधिकाऱ्यांना मात्र अजूनही जाग आली नाही असे दिसून येत आहे. या सर्व अवैधरित्या व्यावसायिक चौर्य कर्मावर कार्यरत ट्रॅक्टरवर आरटीओ विभागाने त्वरित संज्ञान घेऊन कारवाई करावी, तसेच पोलीस विभागाच्या वाहतूक विभागाने सुद्धा या अवैध चालणारा ट्रॅक्टर ची कागदपत्रे तपासून त्यांच्यावर कारवाई करून आरटीओ विभागास सहाय्य करावे अशी आशा घुग्घुस परिसरातील जनता करीत आहे.