चंद्रपूर : आवारपूर सिमेंट वर्क्स या अल्ट्राटेक सिमेंटच्या महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील एकात्मिक सिमेंट युनिटला २०२० चा मानाचा नॅशनल एनर्जी कन्झर्व्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. थर्मल पॉवर प्लांट क्षेत्रात (कोळसा आणि वायू) १०० मेगॉवॉटहून कमी विभागात या युनिटने पहिले पारितोषिक पटकावले.
अनेक नाविन्यपूर्ण पर्यायांच्या वापरातून ऊर्जेचा वापर कमी करण्याच्या आवारपूर सिमेंट वर्क्सच्या प्रयत्नांवर या पुरस्कारामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. मागील वर्षी देखील, आवारपूर सिमेंट वर्क्सच्या थर्मल पॉवर युनिटला थर्मल पॉवर स्टेशन क्षेत्रात उत्कृष्ट ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा (MEDA) द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार लाभला होता. आवारपूर सिमेंट वर्क्सच्या थर्मल पॉवर स्टेशनने मागील दोन वर्षांत आपला सहाय्यक ऊर्जावापर १०.५ टक्क्यांवरून ८.५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रियांमधील निकषांची कमाल मर्यादा यातून हे यश साध्य केले गेले.
आपल्या ऊर्जा वापरात लक्षणीय घट करणाऱ्या युनिट्सना नॅशनल एनर्जी कन्झर्व्हेशन अॅवॉर्ड्स (NECA) दिला जातो. दरवर्षी NECA साठी महत्त्वाच्या क्षेत्रांमधील अनेक औद्योगिक युनिट्स आणि आस्थापनांचे अर्ज येतात.
NECA चा ३० वा सोहळा भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीच्या (BEE) सहकार्याने आयोजित केला होता. ११ जानेवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात ऊर्जा आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा राज्यमंत्री (IC), तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री श्री. आर. के. सिंग प्रमुख पाहुणे होते. सध्याच्या कोविड निर्बंधांमुळे दिल्लीतील विज्ञान भवन येथून हायब्रिड पद्धतीने हा सोहळा पार पडला. देशभरातील भागधारक आणि सहभागी पुरस्कारविजेत्यांनी व्हर्च्युअल व्यासपीठांच्या माध्यमातून यात सहभाग नोंदवला.