खोटी बातमी लावणे पत्रकाराला भोवणार

0
584
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस कॉंग्रेसने केली तक्रार दहा लाखाचा मानहानी दावा

घुग्घुस : सध्या पत्रकारितेच्या नावावर कुठलेही शहानिशा न करता एखादी व्यक्ती, संस्था किंवा राजकिय पक्षाची बदनामी करण्याचे कार्य पोर्टल धारकांना घेतले असून असाच एक प्रकार सध्या घुग्घुस येथे चर्चेत आहे.

भारतीय मजदूर संघ या भारतीय जनता पार्टी समर्थीत लोयड्स मेंटल्स कंपनीतील कामगार संघटनेचा प्रसिद्धी प्रमुख असलेल्या पंकज रामटेके याने काँग्रेस पक्षाची प्रतिमा हेतुपूर्वक खराब करण्यासाठी एक राईफल व पांच जिवंत काडतुस प्रकरणातील पांच आरोपीं पैकी एक आरोपी घुग्घुस काँग्रेसच्या नेत्यांचा समर्थक असल्याचा धांदत खोटा व बदनामी कारक बातमी प्रकाशित केली.

यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यांनी कथित पत्रकार व संपादक यांच्यावर कारवाई करिता निवेदन दिले.

गुन्हेगारां सोबत घुग्घुस काँग्रेस नेत्यांचे संबंध दाखवून काही महिन्यांत होऊ घातलेल्या नगरपरिषदच्या निवळणुकीत काँग्रेसला बदनाम करण्याचा भाजप षडयंत्र असून या आरोपींचे घुग्घुस काँग्रेसशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध पंकज रामटेके व गाव दर्पण या युट्यूब चॅनेलने सिद्ध करावे असे जाहीर आव्हान घुग्घुस काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांनी केले आहे.

यानंतर तातळीने पंकज रामटेके व गाव दर्पण या पोर्टलवर दहा लाखाचा मानहानी व पोलीस तक्रार दाखल करण्यात येत असल्याची माहिती राजुरेड्डी यांनी दिली आहे.