दारू तस्करांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षाच्या घरावर भ्याड हल्ला

0
916
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• जिल्हा परिषद सदस्यालाही मारहाण

• दारू तस्करांची दादागिरी

• संतप्त नागरिकांकडून साडेतीन तास चक्काजाम

नांदा फाटा(चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे चिकन मटण मार्केटसह आडोसा घेऊन सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात त्याच वॉर्डातील महिलांनी दिनांक २९ जानेवारीला हल्लाबोल करून दारू पकडून देत दारूविक्री बंद केल्याने वचपा घेण्यासाठी ७ ते ८ दारु तस्करांच्या टोळक्याने कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रितिका ढवस यांच्या घरावर लाठ्या काठ्याने भ्याड हल्ला हल्ल्यात रितिका ढवस , विजय ढवस , शोभाताई ढवस जखमी झाले ढवस परिवाराचा बचाव करण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषद सदस्य शिवचंद काळे व त्यांचा मुलगा सोनू काळे यांनाही दारू तस्करांच्या टोळक्याने लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली दारू तस्करांच्या भ्याड हल्लाने संतप्त झालेल्या नागरिकांनी व महिलांनी गडचांदूर वणी राज्यमार्गावर चक्काजाम आंदोलन करीत साडेतीन तास रस्ता रोखून धरल्याने पोलिस प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली होती

हल्ला करणार्‍या नांदाफाटा येथील लखन बावणे (३५), सुनिल बावणे (६०), सदाशिव पारधी (४९), कैलाश पारधी (२५), प्रदीप बावणे (३३) यांच्यासह ३ इतरांवर भादंविचे कलम १४३,१४७,२९४,३२३,५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून यासर्वांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे

नागरिकांनी गडचांदूर-आवारपूर रस्त्या जवळपास साडेतीन तास रोखून धरल्याने आवारपुर ते बिबी पर्यंत वाहनांची रीघ लागली होती. दरम्यान पोलिसांनी चक्काजाम खुला करण्यासाठी आंदोलनकर्त्यांना आग्रह केला मात्र आंदोलन करते माघार घेण्यास तयार नव्हते जोपर्यंत दारू विक्री व अवैध सट्टापट्टी कायम बंद करण्याचे पोलीस प्रशासन आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने ठाणेदार गोपाल भारतींची चांगलीच गोची झाली होती दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी घटनास्थळी येऊन दारू विक्रेते व सट्टेबाजांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या कार्यालयापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर घटना घडल्यामुळे परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांची दहशत पसरली आहे.

• नांदाफाटा येथे एक थेंब दारू विकल्या जाणार नाही – सुशीलकुमार नायक

आंदोलनात मध्यस्थी करण्याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक आले असता त्यांनी आंदोलनादरम्यान नांदाफाटा येथे एकही थेंब दारू विकल्या जाणार नाही, सट्टापट्टी, जुगार अशाप्रकारचे कोणतेही अवैध धंदे चालू दिल्या जाणार नाही. असे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्ते शांत झाले व आंदोलन मागे घेतले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, दीपक जयस्वाल, आबीद अली, गडचांदूरचे उपनगराध्यक्ष शरद जोगी, ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत, हारून सिद्दिकी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे आदींनी पोलिसांशी चर्चा करून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली.

जिल्ह्यात अवैध धंदे खुलेआम सुरू आहे. याला संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा जबाबदार आहे. यानंतर अशाप्रकारचे अवैध धंदे जिल्ह्यात सुरू राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाभर प्रत्येक तालुकास्तरावर आंदोलन छेडण्यात येईल.

• राजेंद्र वैद्य, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

आत्मनिर्भर बनावे, अशाप्रकारे शासनाकडून महिला सक्षमीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येतात. मात्र आम्ही अवैध दारू पकडून दिल्यामुळे अवैध दारूविक्रेते आमच्या घरावर आले. अशा घटनांमुळे भविष्यात कोणत्याच महिला अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही.

• रितिका ढवस, तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस