BREAKING : मालगाडीचे बारा डब्बे रुळावरून घसरले, कायर जवळ अपघात

0
2457
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वणी (यवतमाळ) : वणी रेल्वे स्थानका वरून कोळसा भरलेली रेल्वे नांदेड कडे जात असताना कायर गावाजवळील बाबापूर फाट्या जवळ 12 डब्बे रुळा वरून खाली उतरले वणी परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहे.

या खाणीतून उत्खनन झालेला कोळसा विद्युत व अन्य उद्योगा करिता वापरला जातो त्यामुळे सम्पूर्ण देशात वणी रेल्वे सायडिंग वरून मालगाडीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतो वणी येथे ब्रिटिश काळापासून रेल्वे स्थानक आहे दि 1 मार्चला कोळसा भरलेली मालगाडी नांदेडच्या दिशेने साय 6 वाजताच्या सुमारास निघाली असता कायर गावाजवळील बाबापूर फाट्या जवळ मालगाडीच्या 12 डबे रेल्वे रुळावरून घसरले या घटने मुळे परिसरात चांगलीच तारांबळ उडाली होती याची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली असून वृत्त लिहे पर्यंत रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

नव्हते या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा स्वास सोडला कोळसा इतरत्र पसरल्याने बाबापूर मार्ग बंद ठेवण्यात आला आहे हा अपघात नेमका कसा घडला याची माहिती मिळू शकली नाही.