चंद्रपूर : वरोरा शहरातील प्रसिद्ध महाकाली नगरी जवळील रेल्वे पोल क्रमांक 834 /20.25 डाऊन लाईनवर प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची घटना 1 मार्चला उघडकीस आली. आकाश मेश्राम वय 22 वर्ष, गोविंदपूर तालुका समुद्रपूर व मयुरी वय 17 वर्ष राहणार भद्रावती अशी प्रेमीयुगलांची यांची नावे आहे.
मृतक मयुरी ही दिनांक 28 फेब्रुवारीला सकाळी शाळेत जाते म्हणून घरून निघून गेली त्यानंतर ती घरी गेलीस नाही. रात्रीच्या रेल्वेच्या माहिती प्रमाणे रेल्वेगार्डने स्टेशन मास्टर यांना दोन जणांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. रेल्वे विभागाकडून पोलीस स्टेशन वरोरा यांना माहिती दिल्यावर पोलिस घटनास्थळी गेले असता त्यांना एम एच 32F 9685 क्रमांकाची दुचाकी दिसून आली काही अंतरावर युवक-युवती चे कटलेल्या अवस्थेत प्रेत दिसून आल्याने पोलिसांनी युवका जवळील कपड्यांमध्ये आधार कार्ड वरून ओळख पटवली मात्र युवतीजवळ काहीही आढळून आलेले नाही तिची ओळख पटणे कठीण झाले होते.
शेवटी युवतीच्या डायरीमधील नंबर वरून युवती भद्रावती येथील असल्याचे कळताच वरोरा पोलिसांनी भद्रावती पोलिसांशी संपर्क साधला असता युवती मेहता हॉस्पिटल मागे राहत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी दोन्ही प्रेत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. युवक युवती चे प्रेम कसे जुळले व नेमका वाद काय झाला हे अजून पर्यंत कळले नाही. पोलीस विभागाने मृतकाच्या आप्तपरिवारास माहिती कळवली असून पुढील तपास वरोरा पोलीस हेड कॉन्स्टेबल पेंढारकर करीत आहे.